भोग संभोग…

काल बाईकवरुन जात होतो. मित्र आणि मी. थोडं पुढे गेल्यावर एक सिग्नल लागला. आम्ही पुढेच थांबलेलो. आमच्या बाजूला एक बाईकवाला येउन थांबला. कपल होतं. त्यात जी मुलगी मागे बसलेली ती त्या रायडर ला गच्च बिलगून बसलेली. एकदम चिपक्के. त्यांच्या मधून वारा जाण्याइतपतही जागा नव्हती. सगळेजण त्यांच्याकडे पाहात होते. कोण कोणत्या नजरेन पाहत होतं हे सांगणं तस्सं अवघडच. पण ते कपल सगळ्यांच लक्ष वेधून घेत होतं. काही काळ, ही आपली संस्कृती का वगैरे प्रश्न माझ्या मनात घर करुन गेले. तितक्यातच सिग्नल हिरवा झाला. आणि ते कपल वा-याचे वेगाने पुढे निघून गेले. कसं जमतं ह्यांना… ह्यावर मी आणि माझा मित्र चर्चा रंगवू लागलो. मला तर त्या मुलीचं अस चिपकून बसणं अजिबात आवडलेलं नव्हतं. चारचौघात बरं दिसतं का असं बसणं. असा माझा मुद्दा. मित्र म्हणत होता… जर का त्या मुलीला तो मुलगा सर्वस्व वाटत असेल तर तिने दुनियेची का फिकीर करावी. दुनिया बोलत आलीये..बोलत राहणार. त्या मुलीसाठी तिचा प्रियकरच तिची दुनिया असेल. तर त्या मुलीचं काहीच चुकलेलं नाही. माझा मित्र त्या मुलीची थोरवी गाउ लागला. अखेर...