सगळा झवझवाट

जगणं खूप सोप्प नाहीये. कठीण आहे. एकदम Solid . कारण जिथे तिथे झवझवाट आहे. हा शब्द माझ्या एका वाया गेलेल्या मित्राने मला शिकवला आहे. तो खूप घाणेरडा आहे. पत्रकारिता करतो. शरिर संबंध वगैरे सारख्या ब्राम्हणी शब्दांपेक्षा झवझवाट हा क्षूद्र शब्द सर्वसामान्य आणि मिडलक्लास तरुणांचा आवडताच, असा मी आणि माझ्या पत्रकार मित्राने शोध लावलाय. Exellent. खूप कठीण काय असतं, तर जगणं. जगण्यापेक्षा वाईट काय… तर प्रेमबिम करणं. एकदम गलिच्छ. बरं केलं तरं लग्न वगैरे कधीच करु नये. लग्न वगैरे केलंच तर मुलंबिलं जन्माला घालू नये. बरं घातलीच तर त्यांना शाळेत वगैरे तर पाठवूच नये. हे म्हणजे क्रूरच. चूकून पाठवल्यास करिअर वगैरे घडवण्याचा अट्टाहास नकोच. क्षेत्र ठरवलंत तर नोकरी मिळवावीच असा हट्ट नको. हे सगळं नको असेल तर जगणं नको. आणि जगणं नको असेल तर प्रेम तर अजिबातच नको. अतिरेकीच झालं हे तर. माध्यमं पण ना त्येच्या आयला. भ्येच्योत वीट आणलाय ह्या solidity ने. पुस्तकं, सिनेम...