कोण आहे रे तिकडे जिवंत??

शायद वहा पहोचे ना जमाने की नजर जो जख्म मुझे तेरी मोहब्बत ने दिये है.... असं गालिब म्हणतो... जख्मी होण ं हे जिवतपणाचं लक्षण आहे... या जिवंतपणा वर लिहायचं होतं...कारण एका मित्राने एक साधा प्रश्न विचारलेला मला. आपण बस ट्रेन मधून फिरतो... आपल्या बाजूला बसलेला-उभा असलेला माणूस कोण आहे हे आपल्याला का माहित नसतं...? अस्वस्थच झालो... आयुष्याचं होतं तेवढं सगळं ज्ञान पाझळावं असं वाटलं... म्हणून मग हे लिहावंस वाटलं...! लेखांच नाव आहे - 'कोण आहे रे तिकडे जिवंत..?' गिरगाव व्हाय दादर हे नाटक पाहिलं... ब-याच दिवसांपासून पाहायचं राहिलेलं... मित्रांकडून खूपसं चांगलंच एकून होतो नाटकाबद्दल... त्यामुळे अपेक्षा ही ब-याच होत्या... आणि त्यातल्या ब-याच पूर्ण झाल्या... नाटक पाहिल्यावर मी आणि एक मैत्रीण त्यातल्या ब-याचशा गोष्टींवर टिका करत होतो... सुधार सुचवत होतो... पण त्या नाटकाच्या प्रयत्नाला आमचा सलाम होता... आणि अजून चार एक लोकांना घेउन पुन्हा येउ नाटकाला असं ठरलं होतं... मात्र हे नाटक पाहण्याआधी किंवा कोणतंही नाटक पाहण्याआधी आणि नंतर... जग तेच होतं...तेच राहणार आहे...