आता मलाही त्यांची भिती वाटते!

शरद पवारांवर हल्ला झाला २४ नोव्हेंबर २०११ ला. हरविंदर सिंग नावाच्या कुणा पंजाबी युवकाने हा हल्ला केला. चांगलीच कानाखाली पेटवली शरद पवारांच्या. हा प्रकार घडला तेव्हा मी दादर ला होतो. सोबत प्रसाद पराडकर नावाचा मित्र होता. प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही शिवाजी पार्क च्या दिशेने निघालो होतो. जाताना आयडीअल-श्रीकृष्ण च्या गल्लीतनं गेलो. तेव्हा सगळंकाही अगदी सुरळीत चालू होतं. पार्कात बराच वेळ चर्चा करत बसलो होतो. पार्कातल्या मैदानात कबड्डीचे सामने लागले होते. २३ तारखेला बरीच मोठीमोठी नेते मंडळी येउन गेली होती. त्यात शरद पवार हे ही एक नाव आणि फोटो बॅनरवर लागलेला होताच. आणीही फोटो अन् नावे होती. साधारण २च्या सुमारास तिथे एक महिला पत्रकार लोकांना मुलाखतीसाठी विचारणा करीत होती. आम्ही मात्र गप्पांमध्येच होतो. पार्कातलं हे असं पत्रकारांच येणंजाणं काही नवीन नव्हतं आम्हाला. ( नंतर कळालं की ती काय प्रश्न विचारणार होती ते.) साधारण ३च्या सुमारास आम्ही पार्कातून निघालो. येताना शिवसेना भवनाकडनं परतीच्या वाटेला लागलो. बाळासाहेब आणि राज याच्यातल्या तुलनेवर गप्पांम धू न विनोद होत होते...