सगळ्यांचीच जात...

हा ब्लॉग अपडेट करताना मज्जा येतेय. तीन वर्षांपूर्वी केलेला भीमवंदना नावाचा कार्यक्रम पुन्हा करु शकतोस का अशी विचारणा एका मंडळाकडनं झाली आणि जागरण नावाच्या एका काव्यवाचनाच्या ग्रुपच्या आठवणी पुन्हा नव्याने जाग्या झाल्या. त्या मंडळाच्या अध्यक्षाला इतरांना न विचारताच मी नकार देउन टाकला. ह्या मंडळाची एक खासियत आहे. हे लोक शिवजयंती आणि आंबेडकर जयंती एकत्रच साजरी करतात. दोन केक चा खर्च होउ नये म्हणून ही काळजी घेतली जाते, असा माझा एक अंदाज आहे. आणि तो सपशेल चूकीचाही असू शकतो. असो... तर एका दगडात आंबेडकर आणि शिवाजी यांच्यावर अचूक निशाणी लावणारे हे मंडळ आमचा कार्यक्रम होत नाहीये म्हणून माझ्यावर कमालीचे रागावलेत. त्याचा राग कमी व्हावा म्हणून मी त्यांना शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक आयोजित करण्याचा फुकटचा सल्ला दिला. तर बजेट च्या कारणावरुन आणि नाटकाच्या नादग्रस्त नावाला घाबरुन त्यांनी ते नाटक ठेवण्याचं टाळलं. अद्यापही काही त्यांना कार्यक्रम मिळालेला नाही. मी थोड्याफार प्रमाणात त...